सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांची बदली

टीम महाराष्ट्र देशा- राज्य शासनानं गृह विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य रस्ते परिवहन मंहामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी, मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांची नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून तर नागपूरचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांची उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक – प्रशासन कल्पना बारावकर यांची नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या