मोठा भाऊच ठरला वैरी; जागेसाठी भावासह चौघांना पेटवले

सोलापूर : सख्या भावानेच दुसऱ्या भावाला रॉकेल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील खांडवीमध्ये घडला आहे. जागेच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मयतामध्ये एका पोलीस शिपायाचा सदेखील समावेश आहे. आर्यन देवकते, राहुल देवकते, सुषमा देवकते, आणि आरोपीची आई यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

तर आरोपी भाऊ रामचंद्र देवकते याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. काल रात्रीच्या सुमारास घरातील लोक झोपले असताना आरोपीने चौघांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.