सोलापूर : नवीन वर्षात मिळणार भाजपाला नवा जिल्हाध्यक्ष

अजित उंब्रजकर : राज्यपातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्हा भाजपमध्येही बदल होणार आहेत. सध्या बुथ प्रमुखांच्या नेमणुका झाल्या असून तालुकाप्रमुखांच्या नेमणुका महिनाअखेरपर्यंत होणार आहेत. तर नवीन वर्षात महत्वाचे मानले जाणारे जिल्हाध्यक्षपद यंदा नव्या नेत्याला मिळणार आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना दोन टर्म हे पद मिळाले आहे, त्यामुळे यंदा त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले असून त्यांच्या जागी कोण जिल्हाध्यक्ष होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. ग्रामीण भाग माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे असल्याने तो सांगतीलच तोच जिल्हाध्यक्ष होणार हे जवळपास नक्की आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत भाजपमध्ये राज्यात संघटनात्मक बदल होणार आहेत. त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार करता बुथ प्रमुखांच्या नेमणुका पूर्ण झाल्या आहेत. तर तालुकाध्यक्ष (मंडल अध्यक्ष) यांच्या नेमणुका करणे  बाकी राहिले आहे. या नेमणुका झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रकिया होणार आहे. सध्या शहाजी पवार यांच्याकडे हे पद आहे. मागच्यावेळी पवार यांना या पदावर त्यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली होती. त्यामुळे आता शहाजी पवार यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांच्या जागी पक्षाकडून कोणाची नेमणूक होणार, आ. सुभाष देशमुख कोणाचे नाव सूचवणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Loading...

शहाजी पवारांनी केले संधीचे सोने

शहाजी पवार हे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे विश्‍वासू मानले जातात. त्यांना सलग दोन टर्म जिल्हाध्यक्षपद मिळाले. या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले. त्यांच्या कार्यकाळात भाजपाचे चार आमदार निवडून आले. तर जि.प.च्या इतिहासात प्रथमच भाजपाचे 14 सदस्य निवडून आले. याशिवाय पंचायत समिती, ग्रामपंचायतीवरही भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहाजी पवार यांनाच संधी मिळावी, अशी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र भाजपच्या प्रक्रियेत ते बसत नसल्याने नाईलाजाने शहाजी पवार यांना हे पद सोडावे लागणार आहे.

यांच्यात असणार चुरस

शहाजी पवार यांच्यानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी आ.सचिन कल्याणशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, शंकरराव वाघमारे, गजानन भाकरे आदी नावे चर्चेत आहेत. ग्रामीण भाग माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे असल्याने तो सांगतीलच तोच जिल्हाध्यक्ष होणार हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे आ. कल्याणशेट्टी यांचे पारडे जड मानले जात आहे.

सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊः आ. कल्याणशेट्टी

जिल्हाध्यक्ष निवडीची प्रकिया सुरू झाली आहे. मात्र कोणाकडे हे पद जाईल अथवा कोणाची निवड करायची याबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र बसून याचा निर्णय घेतील, असे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी बोलताना सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी