मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून त्याच्या सासूचा खून ; वृध्दास अटक

crime-1

सोलापूर: मुलाने केलेला प्रेमविवाह आणि त्यानंतर पत्नीने केलेली आत्महत्या याचा बदला म्हणून मुलाच्या सासूच्या डोक्यात दगड घालुन खून केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा शिवारात घडली. सिद्राम महादेव गायकवाड (वय 62) असे खून करणा-या आरोपीचे नाव असून तो सोलापूर मधील बक्षीहिप्परगा येथील रहिवासी आहे.मृत सुनिता सुरेश कांबळे (वय 42) यांच्या मुलीचे सिद्राम यांचा मुलगा सागरशी प्रेमसंबंध होते. परंतु आरोपी सिद्राम यांचा या संबंधांना कडाकडून विरोध होता. त्यामुळे सुनिता यांच्या मुलीचा विवाह तुळजापूर तालुक्यातील ओळखीच्या तरुणाशी करुन देण्यात आला. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी त्या तरुणाला सुनिता यांच्या प्रेमाबद्दल माहिती समजली. त्यामुळे त्यांचा विवाह संपुष्टात आला.

यानंतर गावातील काही लोकांनी सुनिताचा विवाह आरोपी सिद्राम यांचा मुलगा सागर बरोबर करुन दिला. हा विवाह ऑगस्ट 2017 मध्ये झाला. यानंतर आरोपी सुनिता व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांवर चिडून होता. विरोध असतानाही परस्पर मुलाने केलेल्या प्रेमविवाहामुळे आरोपी सिद्राम फारच बैचेन होता.

दरम्यान, आरोपी सिद्राम यांची पत्नी बसव्वा या विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. या दोन्ही कारणांमुळे आरोपी सिद्राम याने सुनिता यांना एक ना एक दिवस बघतो अशी धमकीही दिली होती.6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने तक्रारदार सागर सोलापुरमध्ये आला होता. त्याला सायंकाळी घराशेजारील महिलेने फोन करुन आई गवत आणते म्हणून गेली ती परत आली नसल्याचे सांगितले. यानंतर सागर गावाच्या परिसरात आईचा शोध घेतला असता आई शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. त्यानंतर घटनेची माहिती नातेवाईक व पोलिसांना कळवून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी सुनीता यांची तपासणी करुन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले