सोहराबुद्दीन एन्काऊन्टर प्रकरणातीलसर्व 22 आरोपी दोषमुक्त

टीम महाराष्ट्र देशा- सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला असून सर्व 22 आरोपींना सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त करण्यात आले आहे. सरकारी पक्षाला समाधानकारक आणि ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

Loading...

सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटाशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. तसेच त्याची बायको त्यानंतर गायब झाली होती. तिलाही मारण्यात आल्याचे बोलले जात होते.

सोहराबुद्दीनचा मदतनीस तुलसीराम याने ही बनावट चकमक पाहिली होती. मात्र, पोलिसांनी डिसेंबर 2006मध्ये छपरी गावाजवळ त्यालाही चकमकीत ठार मारले होते. दरम्यान, या प्रकरणात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही आरोप करण्यात आला होता. मात्र 2014 मध्ये न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.Loading…


Loading…

Loading...