सोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची शक्यता?

बार्शी : महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळचे सहअध्यक्ष आणि भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आमदार दिलीप सोपल यांची भेट घेतली. मिरगणे यांनी सोपल बंगला येथे जाऊन आ.सोपल यांच्याकडून तिळगुळ घेतले. त्यामुळे बार्शी तालुक्यात भविष्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता निर्माण आली आहे. सध्या या भेटीची सोशल मीडियावर आणि चौकाचौकात चर्चा रंगली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर सोपल आणि मिरगणे यांच्यातील ‘गोड गोड बोला’मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एरवी सोपल यांच्यावर टीका करणारे भाजप नेते राजेंद्र मिरगणे गेल्या काही दिवसांपासून सोपल यांच्याशी जवळीक साधताना दिसत आहेत.

त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी तालुक्याच्या राजकारणात घडनार असल्याच दिसून येत आहे. दरम्यान, मिरगणे यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी दिल्यामुळे मिरगणेंच नेतृत्व वाढीस लागताना दिसत आहे.