भ्रष्ट्राचार मिटवण्यासाठी मोदींनी काही ठोस केल नाही: लोकपालसाठी 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन – अण्णा हजारे

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: मोदी सरकारच्या विरोधात येत्या 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. कॉंग्रेस सरकारच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी तसेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकपाल कायदा कमकुवत केला. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार असल्याच अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. तसेच भ्रष्ट्राचार मिटवण्यासाठी भाजप सरकारने कोणतेही ठोस पाउल उचलले नसल्याचा आरोप त्यांनी केला . नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना अण्णांनी ही माहिती दिली

गेल्या तीन वर्षात आपण तब्बल ३० वेळा पंतप्रधान मोदींना पत्र पाठवली. मात्र त्यांनी उत्तर दिले नसल्याच यावेळी अण्णांनी सांगितले. जो कायदा पाच वर्षात झाला नाही, त्याला तीन दिवसात कमकुवत करण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला.