सुषमा स्वराज यांना चांगला धडा शिकवा; ट्विटर युजरचा स्वराज यांच्या पतीला सल्ला

नवी दिल्ली : पासपोर्ट वादावरून सुषमा स्वराज समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहेत. शनिवारी एका ट्विटर युजरने सुषमा यांचे पती स्वराज कौशल यांना ट्विट करत सुषमा घरी आल्यानंतर त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिम लोक भाजपला कधीही मतदान करणार नाहीत असं म्हंटलं आहे.

यावर स्वराज कौशल यांनी त्या ट्विटचा स्क्रिनशॉट काढून तो पोस्ट केला. त्यात असं लिहलं होतं की, आज रात्री जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिमांमध्ये मतभेद करू नये. मुस्लिम लोक भाजपला मतदान नाही करणार नाहीत.

दरम्यान स्वराज यांनी शेअर केलेलं हे ट्विट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील लाईक केलं आहे. त्याचबरोबर असं ट्विट करणाऱ्या मुकेश गुप्ताचं आणखी एक ट्विट सुषमा यांनी लाईक केलं आहे.