पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद

फेसबुक या सोशल माध्यमावरच्या एका आपत्तीजनक संदेशानंतर इंटरनेट सेवा बंद

पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात, फेसबुक या सोशल माध्यमावरच्या एका आपत्तीजनक संदेशानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातली इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं काल अर्धसैनिक दलाचे तिनशे जवान तिथे तैनात केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे दार्जिलिंगचे खासदार आणि केंद्रीय मंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी, राज्य सरकारनं परिस्थिती नीट न हाताळल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारनं या प्रकरणी अहवाल द्यावा, असा आदेश आज गृह मंत्रालयानं दिला आहे.

You might also like
Comments
Loading...