fbpx

मनसेच्या झेंड्यावर स्वाभिमानचा हात?

टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याचे काल कोल्हापुरात अनावरण केले, या झेंड्यात  भगवा, निळा व हिरव्या रंगाचा समावेश अाहे. तसेच झेंड्याच्या मध्यभागी ‘वज्रमूठ’चे चिन्ह लावण्यात अाले अाहे. मात्र हा झेंडा मनसेच्याच झेंड्याची कॉपी असल्याचे सांगत सोशल मिडीयावर मनसे समर्थकांनी नारायण राणे यांची चांगलीच खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.

सोशल मिडीयावर काहींनी तर चक्क राणेंचा स्वाभिमान मनसेकडे गहान असल्याच्या देखील पोस्ट्स फेसबुक वर केल्या आहेत.जेव्हा राणेंनी शिवसेनेशी फारकत  घेतली तेव्हा खुद्द बाळासाहेबांनी एका भाषणात राणेंना कोंबडी चोर म्हणून कानपिचक्या दिल्या होत्या त्याचाच दाखला देत मनसे समर्थकांनी राणेंना झेंडा चोर म्हणायला सुरुवात केली आहे. सोशल मिडीयावर तर मनसैनिकांनी राणेंविरोधात रान पेटवलय परंतु राज ठाकरे यांची अजून यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही .आता राज ठाकरे हे स्वाभिमानच्या झेंड्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

राज समर्थकांनी केलेल्या काही पोस्ट्स