पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यात गेल्या काही महिन्यांत झालेल्या गंभीर प्रकरणांवर भाष्य केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळेच संजय राठोड यांना मंत्रिपद गमवावं लागल्याचं बोललं जात आहे.
आज चित्रा वाघ यांनी लातूरमधील एका सामान्य महिलेवर सामाजिक विभागातील अधिकाऱ्याने लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणावर भाष्य करत त्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे हे प्रकरण ?
चित्रा वाघ यांनी एका तरुणीची रेकॉर्डिंग पत्रकार परिषदेत सादर केली. ‘माझे वडील हे जीवनविकास प्रतिष्ठान मतिमंद शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांचे २००७ मध्ये निधन झाले. २००७ ते २०१२ या काळात या माझ्या आईने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांची भरती केली नाही. त्यानंतर २०१७ ते २०२१ याकाळात नियुक्ती देण्यात यावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र, लातूरचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी टाळाटाळ केली.’ असं या तरुणीने सांगितले.
‘पुढे खमितकर यांनी, तू गरीब आहेस. तुझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणून जाण्यास सांगितले. यानंतर २२ जानेवारी २०२१० रोजी या अधिकाऱ्याने शारीरिक संबंधाविषयी मला विचारणा केली. तो पर्यंत तुला नियुक्ती देणार नाही अशी धमकी देखील दिली. यानंतर मी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे मदत मागण्यास गेले असता दोन वेळा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसेच, पुन्हा धमकावले. मी देखील एक महिला आहे, मला न्याय मिळावा,’ असं भाष्य या तरुणीने सदर रेकॉर्डिंग मधून केलं आहे.
यानंतर चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘एका पिडीतेला शरीरसुखाची मागणी करण्याची या अधिकाऱ्यांची कशी हिंमत होते. हे असे अधिकारी समाज कल्याण विभागात बसलेत. सामाजिक न्याय विभागात नक्की कोणाचा कित्ता गिरवला जातोय ? कोणाचा धडा शिकवलं जातोय?’ असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं आहे.
‘श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये बाईला शरीर सुखाची मागणी केली जाते ? ज्यावेळी ती न्याय मागायला गेली तेव्हा पोलिसांनी अगदी तत्परतेने तिच्यावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. इतकच नाही तर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनने नोटीस बजावताना या महिलेच्या नावापुढे त्या खमितकर याच आडनाव टाकलं. सदर महिलेने प्रधान सचिव, सामाजिक न्याय, विशेष साहाय्यक विभाग , मंत्रालय, मुंबई यांना शपथपत्र लिहून ही बाब सांगितली आहे,’ असं सांगत या मुजोर अधिकाऱ्यांवर वेळीच कठोर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
पहा चित्र वाघ यांची पत्रकार परिषद –
महत्वाच्या बातम्या
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा