कृषी उत्पन्न बाजार समितीने जपली सामाजिक बांधिलकी; १० व्हेंटिलेटर विलासराव देशमुख शासकीय संस्थेला सुपूर्द

लातूर: लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जपतली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज दि. ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण १० व्हेंटिलेटर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हस्ते सुपूर्द करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कमी होत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जरासा दिलासा लातूरकरांना मिळत आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे संकट अजूनही गेले नाहीये त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये. तसेच सध्याच्या या कोरोनाच्या परिस्थितीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था चांगली कामगिरी बजावत असल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या लाटेमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये गेल्या वर्षीच्या ३१ जून पासुन अविरतपणे गरजु रुग्णांना माफक दरामध्ये सी. टी. स्कॅन तपासणी व एक्सरे तपासणी उपलब्ध करुन देण्यात आली. विशेषत: कोरोनाच्या रुग्णांसाठी तपासणीच्या दिवशीच अंतिम अहवाल रुग्णांना देण्यात येतो. तसेच सी. टी. स्कॅन तपासणीमध्ये किती स्कोर आहे यावरुन रुग्णांना कोरोना संसर्गाची लागण किती प्रमाणात झाली आहे याची माहिती त्वरीत मिळत असल्यामुळे रुग्णांना आवश्यक ते उपचार वेळेत मिळण्यास मदत होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP