अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार; सुरुवात राजघाटपासून?

अण्णा हजारे

जन लोकपाल कायदा देशात लागू करण्यात यावा यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. या आंदोलनानंतर देशात लोकपाल कायदा लागू देखील करण्यात आला. मात्र, मोदी सरकार आल्यापासून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नसल्याने अण्णा नाराज आहेत. त्यामुळे आज गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत

अण्णा गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपालची अंमलबजावणी आणि शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करत आहेत. मात्र मोदी सरकारकडून योग्य दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे महात्मा गांधींच्या जयंती दिनी अण्णांनी राजघाटवर एक दिवसाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.