…तर आज तुमच्या मागणीला नैतिक अधिकार असता ; सावंतांचा मुनगंटीवारांना टोला !

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. मात्र, आज प्रतीक्षा संपली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.

‘मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे. यावर प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करताना संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे. राठोड यांना कितीही क्लीन चिट दिली. आज त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर दोन-चार वर्षांनी त्यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात कारवाई होणारच ना. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण कधीही राठोड यांच्या मानगुटीवर बसू शकतं’, असे स्पष्ट संकेतच मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

तसेच कोणत्याही चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत संबंधित मंत्र्याने आपल्या पदाचा त्याग केला पाहिजे, जी या देशाची उच्च परंपरा आहे’, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. ‘सुधीर भाऊ, संभाजी पाटील निलंगेकर – CBI चौकशी. जयकुमार रावल – एस आय टी चौकशी. दिलीप कांबळे – लाच घेण्याबाबत गुन्हा. इतर अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी क्लीन चिट दिली. पण यांच्यावर कारवाई केली असती तर आज तुमच्या मागणीला नैतिक अधिकार असता’, अशा आशयाचे ट्वीट करत सावंत यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या