‘…तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता’

chandrakant patil vs anil deshmukh

मुंबई : रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपार्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला आहे. यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर, संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट केले आहे. ‘महिलांविषयी अपमानकजनक वागणे सहन करणार नाही. भाजपाने जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हणले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘याच्यामागे कोण आहे, हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र, गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता,’ असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या