नागपूरः काल पुण्यामध्ये भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा दौरा होता. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून स्मृती इराणी यांचा विरोध करण्यात आला. स्मृती इराणी यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आमने सामने आले. या आंदोलनात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उचलल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यावर आता देवेंद्र फडणविसांनी खोचक सवाल उपस्थितीत केला आहे.
कोणत्याही पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पुरुषाचे हात कलम करण्याचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यापूर्वीच्या घटनांच्या वेळी का बोलल्या नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी सर्वच बाबतीत असा निर्णय घेयला हवा. खासदार नवनीत राणांबाबत त्या बोलल्या नाहीत. अनेक लोकांवर, महिलांवर हल्ले झाले, तेव्हा बोलल्या नाही. आमच्याही महिला नेत्यांना पोलिसांनी वाईट वागणून दिली तेव्हाही त्यांनी मौन धरले. त्यांनी ही भूमिका वारंवार घ्यावी आम्ही स्वागत करू.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान-सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या –