‘..तर आम्ही रावसाहेब दानवेंकडे शिकवणी लावूत’, संजय राऊतांचा खोचक टोला

raosaheb danave vs sanjay raut

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. तसेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील चर्चेत आहे. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यापासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा घोळ अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर महाविकास आघाडीने केंद्र सरकारवर आरोप केले होते. मात्र, त्याला महाराष्ट्र भाजपने विरोध केला होता.

यावर भाजपचे केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाणीज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे’ असे ते म्हणाले. यावर प्रत्युत्तर म्हणू संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे.

राऊत म्हणाले, ‘आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू, पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे’

दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून निराश असल्याचे दिसत आहे. तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणामुळे ओबीसी बांधव देखील राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP