…म्हणून विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडली; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं सांगितलं कारण

ganguli

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 टीमचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली आहे.

विराट कोहलीने T20 विश्वचषक स्पर्धा तोंडावर आलेली असताना कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि क्रिकेट जगतात खळबळ उडाली. विराटने स्वतःला थोडी स्पेस देऊ इच्छित असल्याचं सांगत T20 टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं.

विराटने घेतलेल्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतात खळबळ माजली. विराटने हा निर्णय अचानक घेण्यामागचे कारण काय? विराटला का कर्णधारपद सोडावे लागले असे प्रश्न सर्वत्र उपस्थित होऊ लागले. यावरच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सौरव गांगुली यांनी कोहलीच्या निर्णयाची प्रशंसा करत विराटनं हा निर्णय का घेतला? याचं कारणही सांगितलं आहे. बीसीसीआयनं या विषयावर प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यानुसार गांगुलीनं विराटचं वर्णन भारतीय क्रिकेटची ‘खरी संपत्ती’ असं केलं आहे.

त्याचबरोबर हा निर्णय भविष्याचा विचार करत घेतला असल्याचं  म्हंटल आहे. ‘विराट हा भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती आहे. त्यानं टीमचं जबरदस्त नेतृत्त्व केलं. तसंच तो सर्व प्रकारातील भारताच्या यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे. विराटनं हा निर्णय भविष्याचा रोडमॅप लक्षात घेऊन घेतला आहे. तसेच आम्ही विराटच्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानतो. तसंच त्याचा आगामी वर्ल्ड कप आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तो भविष्यातही भारतासाठी भरपूर रन करेल अशी आशा आहे.’ अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या