…म्हणून शिवसेनेसोबत नगरमध्ये युती झाली नाही : महाजन

अहमदनगर : नगर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवलं आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही महापौर पदासाठी उमेदवारीचा फॉर्म भरला असताना ऐनवेळी माघार घेऊन भाजपला पाठींबा दिला.त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटत आहेत.राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रयत्न झाला नाही, असं वक्तव्य महाजन यांनी केलंय. या अभद्र युतीचा कोणताही परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

You might also like
Comments
Loading...