…त्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला – भुजबळ

नाशिक : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळ्याचा निकाल लागला असून सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे. या सुनावणीसंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तेलगी प्रकरणाचा मला नाहक त्रास झाला, त्याचा राजकीय फटका बसला आणि मला राजीनामा द्यावा लागला होता अशी प्रतिक्रिया दिली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

bagdure

या तेलगी प्रकरणात अनेक बड्या नेत्यांची नावे जोडली गेली होती.त्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे पद गमवावे लागले होते.त्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचेही नाव त्यावेळी पुढे आले होते.या बनावट स्टॅॅम्प घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगीसह बाकी ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.आज नाशिक जिल्हा न्यायालयात न्यायधीश पी. आर. देशमुख यांच्या सुनावणीखाली हा निर्णय देण्यात आला आहे.हा ३३ हजार कोटींचा मुद्रांक घोटाळा असून रेल्वेनं देशभरात मुद्रांक पाठवले असल्याचा आरोप होता. या खटल्यात रेल्वे सुरक्षा बल अधिकरी आणि कर्मचारी आरोपी होते.

You might also like
Comments
Loading...