‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या

‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या

सोलापूर : नुकत्याच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या पडल्या. अशातच आता सोलापूर महानगरपलिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. पवार हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायचा याबाबतचा निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, यावर पवार यांनी आज ठोस भूमिका घेतली नसल्याचे दिसून आले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे’ असे वक्तव्य पवार यांनी केले. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना त्यांनी आघाडी होणार की नाही यावर सूचक भाष्य केले.

ते म्हणाले, आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा झाली. यापूर्वीच्या निवडणुकीकडे आपण हवे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या हातात मनपा गेली आणि सोलापूर शहराचा विकास खुंटला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे.’

‘५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. तसेच पक्षवाढीसाठी जशी अनुभवी नेत्यांची गरज असते त्याप्रमाणे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना पुढे केले पाहिजे. या निवडणुकीत तरुणांना संधी द्या, त्यांना विसरू नका, हा माझा आग्रह राहील. एकेकाळी सोलापूर शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जायचे. सोलापूर शहरात मोठी कारखानदारी होती. मात्र आता सोलापूरला कारखाने दिसत नाहीत. सोलापूर मनपात राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात असा माझा आग्रह आहे, कारण मला सोलापूरचे जुने दिवस आणायचे आहेत असे आवाहन पवार यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या