तर…मंत्रालय ‘केशवसृष्टीत’ आणि विधीमंडळाची अधिवेशने ‘रेशीमबागेत’

vikhe patil

पुणे: मराठा सर्वेक्षणाच्या नावाखाली संघ भाजपचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते आज पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषेदेत बोलत होते. मराठा आरक्षणाच्या नावाखाली संघांशी संबंधित संस्थांची घरे भरण्याचाही कार्यक्रम सुरू असल्याचे पाटील म्हणाले.

Loading...

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने या समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि नागपूरच्या शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्थाना देण्यात आली. मात्र विखे पाटील यांनी याचा विरोध करत सरकारवर टीका केली आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम देताना टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस आणि गोखले इन्स्टिट्युटसारख्या दर्जेदार व नामांकित संस्थांना का देण्यात आले नाही असा प्रश्न त्यांनी निर्माण केला.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

संघाच्या शाखेत गोळवलकर आणि हेडगेवारांचे फोटो लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे लावली जात नाही. मुख्य म्हणजे संघाचा आरक्षणालाच वैचारिक विरोध आहे. तरीही संघाशी संबंधित संस्थांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वेक्षणाचे काम देण्यात आले, हे मराठा समाजाचे आणि आरक्षणाच्या मागणीचे दुर्दैव आहे. अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस मंत्रालय केशवसृष्टीत भरेल आणि विधीमंडळाची अधिवेशने रेशीमबागेतहोतील, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.Loading…


Loading…

Loading...