…म्हणून राहुल गांधी गळ्यात पडले : मोदी

शाहजानपूर : ‘आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की अविश्वास प्रस्ताव आणण्याचे नेमके कारण काय आहे. जरा सांगाल का, पण ते कारण सांगू शकले नाहीत आणि मग थेट गळ्यात पडले,’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते सांगत होते.

शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान,शनिवारी उत्तर प्रदेशाती शाहजहाँपूर येथे किसान कल्याण सभेला उपस्थित राहिलेल्या मोदींनी उस उप्तादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना उत्पादन खर्चापेक्षा 80 टक्के अधिक थेट लाभ देण्याची घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

महाआघाडी हा व्यवहार्य पर्याय नाही; पवारांनी महाआघाडीची शक्यता फेटाळली 

भाजपच्या अंतर्गत मामल्यात शिवसेनेला नाक खुपसण्याची गरज नाही – योगी आदित्यनाथ