‘..म्हणून पंतप्रधान मोदींनी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवले!’

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. दोन्ही सभागृहात विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह तहकूब करावे लागले होते. आज राज्यसभेत कोरोनावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत हल्लाबोल केला.

‘पंतप्रधान मोदींनी भारतीयांना ताटं वाजवण्याचे, मेणबत्त्या पेटवण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या गोष्टी आनंदाने केल्या. परंतु त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही आणि लोकांना निराश केले. पण आता जबाबदारी घेण्याऐवजी त्यांनी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवले,’ असे खरगे म्हणाले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.हर्ष वर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यावरून खरगे यांनी टीका केली.

एवढ्या मोठ्या देशात करोनामुळे नेमके किती लोक मृत्युमुखी पडले हेदेखील रहस्यच राहणार का? असा सवाल विरोधी नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.

सरकारकडून देशात ४ लाखांचा आकडा जारी करण्यात आला आहे. हे आकडे खोटे आणि सत्यापासून कोसो दूर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी १५ मे २०२१ रोजी म्हटलं की जे लोक निघून गेले ते मुक्त झाले. सरकारचं समर्थन करणाऱ्या संघाची नीती यावरून दिसून येते, असंही राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP