एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेचा शिवसेनेला टोला

एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेचा शिवसेनेला टोला

मुंबई : मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्रादारांसाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसने केला होता. मुंबई पालिकच्या या निर्णयावरुन शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. या पेंग्विन खर्चावरु राजकीय वाद पेटला आहे. या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसेने पोस्टरबाजी करत शिवसेनेवर टीका केली आहे.

पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. यातच आता मनसेने मुंबईतील काही ठिकाणी पोस्टर लावत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी, असा खोचक सवाल करण्यात आला आहे. मनसेचे कार्यकर्ते संतोष धुरी यांनी आपल्या ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात २०१७ मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष आणि पेंग्विन खरेदीसाठी एकूण २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या