“इतना जो मुस्कुरा रहे हो..”; शिखरची पोस्ट पाहून चाहते भावुक

मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनच्या जीवनात जणू दुःखाचे चक्र सुरु झाले आहे. नुकताच त्याची पत्नी आयेशा मुखर्जी हीने त्यांचे घटस्फोट झाल्याची माहिती दिली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत दोघेही वेगळे झाल्याचे सांगितले आहे. याबाबत शिखरने कोणतेही वक्तव्य केले नाही. वैयक्तिक आयुष्यातील वादळ संपत नाही तोच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरही वाईट स्तिथी दिसत आहे. इतके काही सुरु असताना त्याने एक हसताना फोटो पोस्ट केला आहे. ज्याची चर्चा सगळीकडे होत आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी शिखर दुबईत पोहचला आहे. तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. कोरोनाच्या नियमनप्रमाणे सध्या तो क्वारंटाईन मध्ये आहे. याच दरम्यान त्याने इन्स्ट्राग्राम स्टोरीवर एक हसताना फोटो पोस्ट केला आहे. ज्या खाली त्याने “नेहमी हसत राहा. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे” असा संदेश ही लिहला आहे.

त्याचा इतक्या दुखातही हसतानाचा चेहरा पाहून त्याचे चाहते भावुक झालेले दिसले. त्यांनी शिखराला या कठीण प्रसंगी सहानुभूती दिली आहे. मात्र तो आयपीएल खेळत आहे. ज्यामुळे या काळात तो स्वतःला सावरताना दिसत आहे. आयेशा आणि शिखराचे लग्न २०१२ मध्ये झाले होते. त्या दोघांना जोहरावर नावाचा ७ वर्षांचा मुलगा देखील आहे.

शिखर धवन आयपीएलच्या मध्ये झालेल्या हंगामात उत्तम कामगीरी करत होता. त्याने झालेल्या आठ सामन्यांमध्ये ५४.३८ च्या सरासरीने ३८० धावा केल्या आहेत. आपल्या आयुष्यातील दुःख विसरत तो मैदानावर दमदार कामगिरी करेल अशी आशा चाहत्यांना आहे.

महत्वाच्या बातम्या :