‘..म्हणून मोदींनी मार्च महिन्यातच भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले’, काँग्रेसचा गंभीर आरोप

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबरमध्ये दुसरी लाट येत असतानाही लोकांना अंधारात ठेवले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. कारण पाच राज्यांच्या निवडणुका होत्या. त्यानंतर कोरोनाने हातपाय पसरले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते बुलडाण्यात बोलत होते. कोरोनाच्या संसर्ग होण्यास मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

पटोले यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पक्षाने सत्तेत असताना नियमबाह्य निर्णय घेतले. त्यामुळे ओबींसीचे राजकीय नुकसान झाले. ओबीसींच्या राजकीय नुकसानीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

पटोले म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग करून नागपूर जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याच, पण भंडारा, गोंदिया, पालघर, नंदुरबार व वाशीम या चार जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. या जिल्हा परिषदा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात गेल्या. कोर्टाने निवडणुका थांबविल्या नाहीत तर सदस्य अपात्रतेचा निर्णय मार्चमध्ये दिला.

कोर्टाने असे म्हटले की, ओबीसी जनगणनेचा आकडा केंद्र सरकारने आम्हाला दिलेला नाही. ओबीसीच्या संख्येचे रेकॉर्ड नाही. जे काही ओबीसी रेकॉर्ड दाखवण्यात आले ते चुकीचे आहे. त्यामुळे ओबीसी सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे केंद्रात तुमचे सरकार आहे, त्या वेळी कोर्टाने सांगून दोन वर्षे होऊनही आयोग बसवला नाही. याप्रकारे ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे काम भाजपने ठरवून केले आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केला.

महत्वाच्या बातम्या 

IMP