Share

PM Kisan Yojana | देशात ‘इतके’ कोटी शेतकरी घेत आहेत PM किसान योजनेचा लाभ, केंद्र सरकारने जारी केला नवा आकडा

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात. या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत 4.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर बाराव्या हप्त्याची रक्कम पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बँक आणि कृषी विभागाकडे जाऊन याबद्दल माहिती घेत आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार अधिकाऱ्यांच्या मते, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन आकडा जारी केला आहे. त्यांच्यामध्ये देशातील दहा कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. जेव्हा 2018 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा फक्त 3.18 कोटी शेतकरी या योजनेसोबत जोडले गेले होते. 2021 पर्यंत हा आकडा तिपटीने वाढला असून अधिकाधिक शेतकरी या योजनेसोबत जोडले जात आहे.

देशातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 12 वा हप्ता देण्यात आला आहे. तर, सध्या शेतकऱ्यांची 13 वा हप्ता मिळवण्यासाठी कसरत सुरू आहे. शेतकऱ्यांची ही कसरत लवकरच पूर्ण होणार आहे. कारण 17 फेब्रुवारीपर्यंत प्रधानमंत्री किसान योजनाचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचू शकतो.

या योजनेतील फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणामुळे सरकारने तेराव्या हप्त्यासाठी थोडे कडक नियम केले आहे. यामध्ये सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) आणि जमिनीच्या नोंदणी करून घेणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड देखील लिंक करायला सांगितले आहे. जर तुमचे रेशन कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

का मिळाला नाही 4.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता?

सरकारने बारावा हप्ता देण्यापूर्वी ई-केवायसी आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य केले होते. दरम्यान, काही शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि जमिनीची पडताळणी नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री किसान योजनेच्या बाराव्या हप्त्यापसून वंचित राहावे लागेल. तब्बल 4.5 कोटी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन अपडेट केली नव्हती. त्यामुळे त्यापैकी कोणत्याही शेतकऱ्याला हा हप्ता मिळाला नाही.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली …

पुढे वाचा

Agriculture

Join WhatsApp

Join Now