पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानसेवेतून ‘इतक्या’ नागरिकांचे झाले आगमन

pune

पुणे –  25 मे 2020 पासून  देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे.  25 मे 2020 रोजी  11 विमानाने  823 तर 26 मे 2020 रोजी  8 विमानाने 344 प्रवाशांचे असे एकूण 1,167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

या येणा-या प्रवाशांबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24 X7  करण्यात आली आहे. पुणे विमानतळ येथे उतरणा-या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांनी याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाचे  राजशिषटाचार अधिकारी अमृत नाटेकर यांच्या संपर्कात राहण्याचे तसेच  वेळोवेळी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यंदा ‘सीईटी’ नको ; संस्थाचालक, प्राचार्याची मागणी

#corona : राज्यात कोरोनाचा कहर; वाचा एका क्लिकवर संपूर्ण आकडेवारी