Share

BJP-ShivSena alliance | गरज पडली तर पारंपारीक मित्र शिवसेनेसोबत जाऊ ; भाजप नेत्याचे मोठे विधान

BJP-ShivSena alliance |  पुणे : एकीकडे भाजप, शिंदे गट, मनसे, असे समिकरण राज्यात तयार झाल्याचे चित्र आहे. मनसेकडून भाजपवर टीका देखील बंद झाली आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमिवर माजी भाजपचे खासदार संजय काकडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मनसेसोबत युती करण्याची भाजपला गरज नाही. भाजपने मनसेसोबत युती केल्यास विरोध करणार, असेही काकडे म्हणाले. लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींवर टीका करणाऱ्यांसोबत युती कशाला. गरज पडली तर पारंपारीक मित्र शिवसेनेसोबत युती करु, असे विधान संजय काकडे यांनी केले आहे.

“आम्ही युती केली तरी ती मतं आम्हाला पडणार नाहीत. मनसे शिवसेनेची बी टीम आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. शिवसेना फुटून मनसे झाला आहे. आम्ही युती केली आणि टीकटे जरी दिली तर लोक शिवसेनेला मतं देतील. त्यामुळे युती करण्याची आवश्यकता नाही. युती करण्याची गरज पडली तर आम्ही पारंपारीक मित्र शिवसेनेसोबत जाऊ”, असे वक्तव्य माजी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

आम्ही युती का करायची-

संजय काकडे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस , भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबत गाठीभेटी मी पाहत आहे. बाळा नांदगावकर देखील पुण्यात येऊन गिरीश बापट यांना भेटून गेले. परंतु ह्या गाठीभेटी सर्वच पक्षात होच असतात. याचा अर्थ युती होईल, असं मला वाटत नाही. पुण्यात पण आम्ही युती करणार नाही. तसेच महाराष्ट्र स्तरावर प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने सांगू की आम्ही युती का करायची. राज ठाकरे यांनी २०१९ ला नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट टीका केली होती. लाव रे तो व्हिडीओ, लाव रे ती सीडी, अशा प्रवृत्तीच्या मानसाशी आम्ही का युती करायची. हे मला योग्य वाटत नाही.”

भाजप-मनसे युती होणार? – 

मुंबई, पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप-मनसे युती होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आगे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटासोबत देखील राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. त्यामुळे हे समीकरण महत्त्वाचे ठरू शकते. मात्र संजय काकडे यांच्या विधानाने चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

BJP-ShivSena alliance |  पुणे : एकीकडे भाजप, शिंदे गट, मनसे, असे समिकरण राज्यात तयार झाल्याचे चित्र आहे. मनसेकडून भाजपवर टीका देखील बंद …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune