…तर मुंबईतील लोकल सेवा सुरु करणे शक्य ; मंत्री आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य

aditya thakrey and local

मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.

अनलॉक-४ प्रक्रियेअंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अनेक खाजगी कार्यालायसह दैनंदिन व्यवहार सुरु झाल्यामुळे नागरिकांना दळणवळण करावे लागत आहे. मात्र, सद्या मुंबईतील लाईफलाईन असलेली लोकल सेवा अजूनही बंद ठेवल्याने बेस्ट वरील ताण वाढत आहे. बेस्ट बसेसमध्ये तुडुंब गर्दी होत असूनही राज्य सरकार व महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

लोकल सेवा सुरु करण्यासाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कायदेभंग आंदोलन देखील केले होते. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात अनलॉक-५ घोषित करण्यात येणार आहे. किमान यावेळी तरी मुंबईकरांना दिलासा मिळेल का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अशातच पर्यटन मंत्री व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी एका वृत्रपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणि लोकसंख्येचा विचार करता कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. कार्यालयातील कामासाठी पूर्ण 24 तासाचा वापर करता येतो का, यावर विचार सुरू आहे. यातून लोकल सेवेवर अतिरिक्त ताण येणार नाही. तसे झाले तर ऑक्टोबरपासून सर्वांसाठी लोक सुरू होऊ शकते. याबाबत उद्योजकांशीही संवाद सुरू असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

कार्यालयांची कामकाज वेळ भिन्न ठेवली तर एकत्र गर्दी बाहेर पडणार नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका देखील कमी होऊ शकतो. तर लोकल सेवेवरील ताण कमी होऊन सर्वसामान्यांसाठी देखील लोकल सुरु होऊ शकते असे सूचक वक्तव्य देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी केले आहे.

महत्वाच्या बातम्या