…त्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडले- राजनाथ सिंह
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारतीय हद्दीतून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याची घटना घडली होती. दरम्यान, आज(१५ मार्च) राज्यसभेत बोलत असतांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती दिली आहे.
यासंदर्भात बोलत असतांना राजनाथ सिंह म्हणाले की,‘९ मार्च रोजी ही घटना घडली. क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभाल आणि तपासणी सुरू असताना संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अपघाताने क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नंतर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची माहिती मिळाली.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या घटनेसंदर्भात ऑपरेशन, देखभाल आणि तपासणीसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियांचा आढावा घेतला जात आहे. आम्ही आमच्या शस्त्र यंत्रणेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. यासंदर्भात काही त्रुटी आढळून आल्यास तत्काळ दुरुस्त करण्यात येईल.’ तसेच ही घटना खेदजनक असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
“लडेंगे और जितेंगे भी…“, दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
-
“…आता तरी हिजाबवर ‘controversy’ करणाऱ्यांनी चूप बसावे”, फडणवीसांची प्रतिक्रिया
-
‘महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र पुढे गेलो पाहिजे’ – विजय वडेट्टीवार
-
“शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा घोटाळे बाहेर काढू” – राजू शेट्टी आक्रमक