…म्हणून मी रुग्णालयात गेलो होतो; जयंत पाटलांनी ट्विट करून दिली तब्येतीबाबत महत्वाची माहिती

jayant patil

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीतच त्यांना अचानक अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त आहे.

‘जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम असून नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,’ अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. याबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट प्रकृतीबाबत खुलासा केला असून अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील समर्थकांना केलं आहे.

‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’ असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या