‘…म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं’, अजितदादांचे रोखठोक स्पष्टीकरण

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आमदार निलेश लंके यांचे समर्थक असणाऱ्या या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याने विरोधकांना आयतेच टीका करण्याचे कोलीत मिळाले होते. अखेर आता राजकीय नाट्यावर पडदा पडला असून नगरसेवक पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले आहेत.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी केला होता. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी मध्यस्थी करावी लागली. पवार यांनी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी अजित पवार हे देखील उपस्थित होते.

‘सारथी’वरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पारनेरमधील पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला यावेळी बोलताना या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

पवार म्हणाले, ‘मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना सांगत होतो, काळजी घ्या. तेव्हा काही वाहनं आली. तिथे आमदार निलेश लंके आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे, तर ते मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात गमछे टाकले. कार्यक्रम झाला आणि मग मला कळलं की, ते शिवसेनेचे होते.’

अजित पवार म्हणाले,या आधीही अम्ही राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून सत्तेत होतो. तेव्हाही आम्ही असे प्रवेश देत नव्हतो. घडला प्रकार पूर्ण माहिती नसल्याने घडला. त्यामुळे त्यात दुरुस्ती करण्या आली. यापुढे सर्वच मित्रपक्ष अशा गोष्टींवर संगनमताने निर्णय घेतील. मात्र, यातून उगाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले किंवा महाविकासआघाडी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे असा कुणीही अर्थ काढू नये. मुख्यमंत्र्यांची आणि आमची या विषयावर चर्चाही नाही.

दिल्लीत 200 युनिट पर्यंत वीज मोफत, महाराष्ट्रात मात्र भरमसाठ बिले पाठवली जात आहेत

माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे – संभाजीराजे

‘मंदिरे, देवस्थाने सुरु करुन त्यात मर्यादित संख्येने भजन-किर्तन, पूजा-अर्चना करण्याची परवानगी द्या’