..म्हणून मला अंबानी-अदाणीबद्दल सहानुभूती, पंतप्रधान मोदींचा खुलासा

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये पहिली प्रचारसभा घेऊन विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही सौम्य भाषेत समाचार घेतला. राहुल गांधी यांनी मोदींवर ‘हम दो हमारे दो’असे म्हणत टीका केली. तसंच मोदी मित्रांसाठी काम करतात असा आरोप केला होता. त्यांचा रोख अंबानी-अदाणी या नावांसह गुजरातमधील उद्योजकांकडे होता. बंगालमधील सभेत या आरोपांना मोदींनी प्रत्यूत्तर दिले.

मोदी म्हणाले, आज काल आमचे विरोधी पक्ष मी मित्रांसाठी काम करतो, असा आरोप करत आहेत. आपणा सगळ्यांना माहितीय की आपले जिथे लहानपण गेले, जिथे आपण वाढलो, खेळलो, जिथे आपण शिकलो, तिथल्या लोकांबद्दल आपल्या मनात प्रेमाची सहानुभूतीची भावना असते. मी गरिबीत वाढलो. मी गरिबीशी संघर्ष केला. त्यामुळे देशभरातील कोणत्याही कोपऱ्यातील गरीब मला जवळचा वाटतो. त्याच्यासाठी काम करावे वाटते. त्यांचे दु:ख मला माझे दु:ख वाटते. माझ्या जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत मी त्यांच्यासाठी काम करत राहीन, असे मोदी यावेळी म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेची फसवणूक केली

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांची बंगालमध्ये पहिली प्रचार सभा पार पडली. या सभेसाठी प्रचंड गर्दी जमली होती. ब्रिगेड परेड ग्राऊंडमधून त्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेची फसवणूक केलीय. पण आता काळजी करू नका. येत्या निवडणुकीत तुम्हाला परिवर्तन करण्याची संधी आहे. तेव्हा यावेळी आपण ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांवर निशाना साधला.

मोदी म्हणाले, तृणमुल हे काँग्रेसचेच गोत्र आहे. तर भाजपच्या मुळात बंगालची महक आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत कमळाचे बटन दाबून कमाल केली. आताही तीच वेळ आली आहे. एका मताची किंमत काय आहे ती आपण काश्मीरपासून अयोध्येपर्यंत पाहिली आहे. यावेळेसही आपण कमळाचे बटन दाबून टीएमसीचा सुपडा साफ करा, असे आवाहन मोदींनी केलं.

महत्वाच्या बातम्या