.. तर मला ‘सामना’चे काम सोडावे लागेल-संजय राऊत

sanjay raut

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका टीव्ही चॅनेल च्या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली. यावेळी बोलत असतांना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले.

यावेळी राऊत यांना केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या विधानाविषयी विचारण्यात आले असता ते म्हणले की,’.गडकरी म्हणले होते, आमदारांना मंत्रिपद नाही म्हणून नाराज, मंत्र्यांना खातं नाही म्हणून नाराज, तर चांगलं खातं मिळालेल्यांना मुख्यमंत्रिपद नाही त्यामुळे नाराज आहेत. याशिवाय आपलं पद कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्रीही टेन्शनमध्ये असतात’.

दरम्यान, गडकरींना प्रतिउत्तर देत राऊत म्हणाले की,’माझी काहीही अपेक्षा नाही. मला खासदार व्हायचंय किंवा केंद्रात मंत्री व्हायचंय अशी कोणतीच अपेक्षा नाही. मी राज्यसभेचा खासदारही इच्छा नसताना झालो. आता तिथे रमलो. जर केंद्रामध्ये मी मंत्री झालो तर मला जे माझे आवडीचे काम आहे ‘सामना’चे ते मला सोडावे लागेल,असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या