औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांना सांड म्हटले होते. यावरुन काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. या संदर्भात दानवे यांनी आता खुलासा केला आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास करुन काँग्रेसचे नेते भाष्य करत असतील तर ही काँग्रेसची सुनी सवय असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे.
मोदी मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या नेत्यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा सध्या सुरू आहे. त्यात डॉ. भागवत कराड यांच्या यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या वेळी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी राहुल गांधी यांची तुलना देवासाठी सोडलेल्या ‘सांड’ सोबत केली होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते दानवे यांच्यावर टीका करत होते. या सर्व प्रकरणात आता दानवे यांनी खुलासा केला आहे. मात्र, त्यातही त्यांनी राहुल यांची तुलना पुन्हा सांड म्हणूनच केली आहे.
या संदर्भात रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगण्यासाठी आपण बैलाचे उदाहरण दिले होते. त्यात एक काम करणारा बैल आणि दुसरा काम न करणारा बैल म्हणजेच ‘सांड’ असल्याचे आपण सांगितले. देशात काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून काम न करणारे काँग्रेसचे राहुल गांधी आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देशावर जेव्हा संकटं आली तेव्हा कड्या-कुलुपं लावून घरात बसले, संजय राऊतांची टीका
- राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य- प्रवीण दरेकर
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
- ‘जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, रावसाहेब दानवेंवर पलटवार
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य