…त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते – तृप्ती देसाई

मुंबई : ‘आज पर्यंत अनेक मंदिर गाभारा प्रवेश, हाजी अली दर्गा प्रवेश आंदोलने केली. परंतु कधीच कोणाला, कोणाच्या धार्मिक भावनांना मी दुखावले नाही. इंदुरीकर यांना वारंवार महिलांचा अपमान केल्याप्रकरणी आम्ही विरोध करीत आहोत. यात कोठेही वारकरी संप्रदाय किंवा हिंदू धर्म याबद्दल मी काहीच चुकीचे बोलले नाही वारंवार संप्रदाय आणि हिंदू धर्माचा मी आदरच करते,’ असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई म्हणाल्या.

त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्या म्हणतात, परंतु मी धार्मिक भावना दुखावल्या असे अनेक खोटे आरोप माझ्यावर होत असून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, महिलांच्या अपमानाच्या वक्तव्याला विरोध याला धार्मिक रंग लावणे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे मत त्यांनी या पोस्टमध्ये मांडले आहे.

Loading...

पुढे त्या म्हणतात, त्यामुळे असे खोटे आरोप माझ्यावर कोणीही करू नयेत. मी कधीही कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत आणि दुखावणार नाही, आणि जर कोणाला वाटत असेल की धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत ,मी तर दुखावल्या नाहीत तरीही असे काही जणांना जर वाटत असेल तर मी जाहीर माफी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या मनाने मागत आहे ,’ असे म्हणत तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे.

दरम्यान, महिलांचा अपमान केल्याप्रकरणी तसेच पीसीपीएनडीटी ॲक्टनुसार इंदुरीकरांवर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमची मागणी कायम आहे आणि राहील,’ अशी ठोस भूमिका त्यांनी या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....