…तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध कशी करणार? फडणवीसांचा काँग्रेसला सवाल

fadanvis vs balasaheb thorat

मुंबई : काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून संजय उपाध्याय ही जागा लढवणार आहेत. तर आता काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार दिला जात नाही. ही माहाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही भाजपला विनंती करणार असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. यावर आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

आमच्या पक्षात कुठलाही निर्णय मी एकटा करत नाही. पक्षाच्या कोअर कमिटीशी मी चर्चा करेल आणि त्या आधारावरच निर्णय होऊ शकतील. आता तरी कोअर कमिटीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आम्ही फॉर्म भरला आहे. निवडणूक बिनविरोध व्हायची असेल तर त्यांनी त्यासाठी नक्की प्रयत्न करावा. आम्हाला प्रतिप्रश्न करुन निवडणूक कशी बिनविरोध होईल? भारतीय जनता पक्षाने काही विचार करुनच फॉर्म भरला असेल. समजा उद्या नाही लढवायची असंही कोअर कमिटीच ठरवेल.’ असे स्पष्ट मत आज माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या