…म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला

…म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला

बारामती : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ गंभीर आरोप केले आहे. आता किरीट सोमय्या, ‘6 तारखेला म्हणजेच आज बारामतीला जाणार आहे’, असं म्हणत बारामतीमधील बरजंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. त्यावर मंगळवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघाच्या पाहणी दौऱ्यावर होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी किरीट सोमय्यांना मिश्किल टोला लगावला आहे.

‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते’ असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. ‘बारामतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच केलं जाईल’, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी उत्तर प्रदेशातल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

किरीट सोमय्या आज बारामती दौऱ्यावर येणार आहेत, याबाबत पत्रकारांनी विचारले असता काही से मिश्किल हास्य करत सुळे म्हणाल्या की, ‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते. त्यामुळे सोमय्या यांचं बारामतीला येणे काही नवीन नाही’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत जास्त बोलणे टाळले.

महत्त्वाच्या बातम्या