नितेश राणे यांचे शिवसेनेवर टीकास्र

नितेश राणे

वेबटीम : जैन मुनींनी भाजपचा प्रचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एखाद्या धार्मिक व्यक्तीने अशाप्रकारचा प्रचार करणे म्हणजे हा आचारसंहितेचा भंग आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. यावर संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष करत जैन मुनींची तुलना झाकीर नाईकशी केली होती , यावर नितेश राणे यांनी शिवसेनेला चांगलच फैलावर घेतल घेतल आहे. जो शिवसेनाला पाठींबा देईल तो हिंदू आणि जर शिवसेनेला विरोध केला तर झाकीर नाईक असा नवा अर्थ हिंदुत्वाचा झाला असावा असे ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, “मनी आणि मुनी”च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर जिंकलं. भाजपचा हा विजय महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारा आहे. जामा मशिदींचे इमाम याआधी असे फतवे काढत होते. तसेच फतवे मिरा-भाईंदर निवडणुकीत जैन मुनींनी काढले. ‘ज्यांनी असे फतवे काढले ते राजकीय गुंड आहेत. त्यांची तुलना मी झाकीर नाईकशी करतो”, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला होता .