fbpx

… म्हणून ५ वर्षानंतर पत्रकार परिषद घ्यावी लागली : अशोक चव्हाण

ashok chawan and narendra modi

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेसाठी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. पण मोदींनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. याउलट पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षांची आहे त्यामुळे मी उत्तर देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘देशात मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला आहे. म्हणूनच ५ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर पत्रकार परिषद घ्यावी लागली, अशी टीका केली आहे. तसेच मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाचे मोठं नुकसान झालं आहे. या निवडणुकीत मात्र परिवर्तन होणार आहे. पाच वर्षांनंतर पीएम यांना प्रेस घ्यावे वाटली, हा बदल का झाला. कारण लोकांची नाराजी त्यांना समजली आहे, असंही चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेवरून राज ठाकरे यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”,असे ट्विट करत त्यांच्या काहीच न बोलण्यावर टीका केली आहे.