स्नेहबंध परीवारा तर्फे दिला जाणारा ‘स्नेहबंध’ पुरस्कार जाहीर

नेवासा / भागवत दाभाडे : रांजणगाव देवी येथील स्नेहबंध प्रतीष्ठानच्या वतीने दर वर्षी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या सामाजिक ,उद्योग, कृषी ,शासकीय अधिकारी ,पत्रकार या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरविन्यात येते.

या वर्षी सामाजिक क्षेत्रात शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापु कोते, उद्योग क्षेत्रात घोडेगावचे सचिन देसरडा, शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे ,कृषी क्षेत्रात दिनेश गुगळे, तर पत्रकारितेत गोरक्षनाथ मदने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे.

मा. खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे. या निमित्ताने रांजणगाव मोहत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे.कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे

You might also like
Comments
Loading...