श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांचा बुरखा फाटला, आपोआप नव्हे स्थानिकांनी आणून सोडला नागोबा

टीम महाराष्ट्र देशा- परळी अंबाजोगाई कन्हेरवाडी हे गाव अचानक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कण्हेरवाडी शिवारात मुरूम काढण्यासाठी डोंगर खोदला जात असताना दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी जमिनीखाली एक भग्न मूर्ती सापडली,या मूर्तीवर अचानक एक नागराज वेटोळा घालून बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे गाव रातोरात चर्चेत आलं. भल्याभल्यांना चक्रावून टाकणाऱ्या या प्रकरणाने आता नवे वळण घेतलं आहे. नवी जी माहिती समोर आली आहे त्यामुळे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या मंडळींचा अक्षरशः बुरखा फाटला आहे.

कण्हेरवाडी शिवारात रस्त्याचं खोदकाम करताना मूर्ती सापडली, अचानक एक प्राचीन देवतेची मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीजवळ नाग बसून होता, असा दावा करण्यात आला. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी परिसरात पसरली आणि बघ्यांनीही गर्दी केली. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडीतील घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे.या ठिकाणी मूर्तीवर अचानक प्रकटलेले नागराज हे तिथल्याच काही स्थानिक लोकांनी आणून सोडल्याचा धक्कादायक एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामुळे श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

जमिनीखाली एक भग्न मूर्ती सापडली,या मूर्तीवर अचानक एक नागराज वेटोळा घालून बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काही पुजारी आणि स्थानिक लोकांनी या ठिकाणी पूजा सुरू केली. हा व्हिडिओ समोर आल्यावर अचानक भाविक भक्तांनी गर्दी करीत या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करीत श्रद्धेचा बाजार मांडला.एका दिवसात या नागराजामुळे 1 लाख रुपयाची कमाई झाली.