fbpx

नादचं खुळा; सांगलीची स्मृती मानधना बनली नंबर वन महिला फलंदाज

टीम महाराष्ट्र् देशा – भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आयसीसी रँकिंगमध्ये जगातील अव्वल महिला फलंदाज ठरली आहे. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे.

स्मृतीने न्यूझीलंडविरोधात तीन एकदविसीय सामन्यात दमदार फलंदाजी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर आयसीसीने जाहिर केलेल्या क्रमवारीत स्मृती जगातील सर्व महिला क्रिकेटपटूंना मागे टाकत बॅटसवूमन झाली आहे.

स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन डे सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. मानधनाचं हे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं सहावं अर्धशतक आहे. मानधनाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य महिला क्रिकेट संघाविरुद्ध प्रत्येकी दोन अर्धशतकं ठोकली आहेत.

1 Comment

Click here to post a comment