भिडे गुरुजींनी केलेली ‘ही’ विनंती स्मृती इराणी टाळू शकल्या नाहीत

सांगली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांची भेट घेतली. स्मृती इराणी या सांगलीत भाजपच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आल्या होत्या. स्मृती इराणी यांनी संभाजी भिडे गुरुजींची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी सांगलीत आल्या होत्या. सांगलीतील मारुती चौकातील सभा संपल्यानंतर त्यांनी भिडे गुरुजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर स्मृती इराणी यांनी भिडे गुरुजींची भेट घेतली.

भिडे यांनी त्यांना रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधी दर्शनासाठीही येण्याचे निमंत्रण दिले. श्रीमती इराणी म्हणाल्या,"संभाजी भिडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरुवर्य आहेत. दोघांनी संघात एकत्र काम केले. शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे मोठे कार्य सुरु आहे. त्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत असं त्या म्हणाल्या.

याप्रसंगी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही मात्र भिडे गुरुजींनी जिजाऊ जयंती निम्मित सांगलीत येण्याचे दिलेले निमंत्रण स्मृती इराणी यांनी स्वीकारले.आणि कार्यक्रमास येण्याचे मान्य केले. भिडे गुरूजींनी स्मृती इराणींना रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येण्याचं निमंत्रणही दिलं.

महत्वाच्या बातम्या