‘दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसेच काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा’

rahul gandhi vs smruti irani

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे, राज्यात प्रचार आता शिगेला पोचला आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोप, उपरोधिक टीका आणि आश्वासनांची चढाओढ लागलेली दिसते आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसेच काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे बोलताना केले. सांगलीमध्ये निवडणूक प्रचार सभेत त्या काल बोलत होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा काल अमरावती जिल्ह्यातल्या चांदुर रेल्वे इथं झाली. यावेळी त्यांनी, गेल्या पाच वर्षात युती सरकारनं केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. मुंबई नागपूर द्रुतगती महामार्गामुळे विदर्भात मोठे उद्योग येतील; असं ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यात बारड इथंही काल मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोलापूरसह बार्शी, मोहोळ तसंच, उस्मानाबादमध्ये जाहीर सभा घेतली. मराठवाड्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी युती सरकारनं वॉटरग्रीड योजना मंजूर केल्याच ते उस्मानाबादमधल्या सभेत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या