राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडलंय, त्यांना मतदान करून ‘घाटे का सौदा’ करु नका – स्मृती इराणी

blank

टीम महाराष्ट्र देशा – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या प्रचारानिमित्त महाराष्ट्रात आहे. त्या श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्र्वादीवर सडकून टीका केली. तसेच भाजपला निवडणून द्या असं आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी बोलताना इराणी यांनी देशात भाजपचे सरकार आहे. यानंतरही भाजपचेच सरकार येणार आहे. त्यामुळे त्यांना मतदान करुन घाटे का सौदा करु नका. त्यांचे घड्याळ बंद पडलेलं आहे. सत्तेच्या माध्यमातून जेव्हा स्वत:ची तिजोरी भरली त्याच वेळी त्यांचा खेळ संपला आहे अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

पुढे बोलताना इराणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र चांगली प्रगती करत आहे. देशात आणि राज्यात भाजपचेच सरकार असणे गरजेचं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची लूट चालवली होती असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बंबंरव पाचपुते मैदानात आहेत. तर त्यांना विरोधक म्हणून राष्ट्रवादीने घनश्याम शेलार यांना उमेदवारी दिली आहे. तसेच विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या