राहुल गांधी पंतप्रधानांची गळाभेट घेतात मात्र आयकर अधिकाऱ्यांपासून लांब पळतात : स्मृती इराणी

टीम महाराष्ट्र देशा- नॅशनल हेराल्ड तसेच बँकांच्या एनपीए प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे संसदेत पंतप्रधानांची गळाभेट घेतात मात्र आयकर अधिकाऱ्यांपासून लांब पळतात.काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे एनपीए वाढला. त्यांच्या या नितीमुळे बँकांना करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला, असा आरोप इराणी यांनी पत्रकार परिषदेत केला.

राहुल गांधी म्हणजे नरेंद्र मोदी समोर नाल्यातील किड्याप्रमाणे – केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत इराणी यांनी काँग्रेस हेच एनपीए वाढण्यास जबाबदार असल्याचे म्हटले. तर नॅशनल हेराल्ड प्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या की, आयकर रोखण्यासाठी राहुल गांधी न्यायालयात गेले होते. राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनी केवळ काँग्रेस हितासाठी काम करते, असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यावर संसदीय समितीने एनपीएबाबत पाठविलेल्या उत्तरात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एनपीए वाढण्यात तत्कालीन युपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

एनपीए वाढण्यास काँग्रेस जबाबदार : रघुराम राजन