दिशाहीन काँग्रेस राज्याला काय दिशा देणार – स्मृती इराणी

Smriti-Irani_ 1

लातूर : देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा ३७० ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जातो. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली आहे. अशी दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? त्याच्याकडून कोणतीच दिशा नको अशी टीका स्मृती इराणी यांनी केली. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

स्मृती इराणी म्हणल्या, काँग्रेसने देशाला विकासापासून वंचित ठेवले. गरीब गरीबच रहावा असा सातत्याने प्रयत्न केला गेला. गरीबांना गॅस, स्वच्छतागृह ते देवू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून गरीबांचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱयांचे कर्ज माफ का केले नाही असा प्रश्न राहूल गांधी उपस्थितीत करीत आहेत. एकट्या महाराष्ट्रात १८ हजार कोटीचे कर्ज माफ झाले. शेतकरी सन्मान योजनेत २४ हजार कोटी मंजूर केले. राहूल गांधी यांनी मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये खोटे बोलून मते घेतली. ही महाराष्ट्र की पब्लिक है बाबू अशी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या